महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेजपाल खटल्याचा ऐतिहासिक निकाल ऐकायला माझे वडील हवे होते - अ‍ॅड. शेन गोम्स - Tejpal’s daughter Cara Tejpal

सहाशेपेक्षा जास्त पानांचा अंतिम युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर सादर केले होता. या खटल्याचा ऐतिहासिक निकाल ऐकायला आज ते आमच्यात नाहीत याच दुःख आहे. हा निकाल ऐकायला ते हवे होते. न्यायालयाच्या या निकालाचे मी स्वागत करतो, अशी भावाना या खटल्यातील तरुण तेजपाल यांचे वकील दिवंगत राजीव गोम्स यांचे पुत्र अ‍ॅड. शेन गोम्स यांनी व्यक्त केली.

निकाल ऐकायला माझे वडील हवे होते - अ‍ॅड. शेन गोम्स
निकाल ऐकायला माझे वडील हवे होते - अ‍ॅड. शेन गोम्स

By

Published : May 22, 2021, 10:00 AM IST

Updated : May 22, 2021, 10:11 AM IST

पणजी (गोवा) - माझ्या वडिलांनी प्रचंड मेहनतीतून संपूर्ण देशात गाजलेला तरुण तेजपाल यांचा खटला लढला. सहाशेपेक्षा जास्त पानांचा अंतिम युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर सादर केले होता. या खटल्याचा ऐतिहासिक निकाल ऐकायला आज ते आमच्यात नाहीत याच दुःख आहे. हा निकाल ऐकायला ते हवे होते. न्यायालयाच्या या निकालाचे मी स्वागत करतो, अशी भावाना या खटल्यातील तरुण तेजपाल यांचे वकील दिवंगत राजीव गोम्स यांचे पुत्र अ‍ॅड. शेन गोम्स यांनी व्यक्त केली. गोव्यातील नामवंत वकील राजीव गोम्स यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे.

तेजपाल खटल्याचा ऐतिहासिक निकाल

अ‍ॅड. शेन गोम्स गहिवरले-

अ‍ॅड. शेन गोम्स यांना यावेळी गहिवरुन आले. अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी संपूर्ण देशात गाजलेल्या या खटल्यात मोठी मेहनत घेतली होती. अ‍ॅड. सुहास वेळीप न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी हा निकाल आमच्यासाठी मोठा विजय आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, निवाडा देणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. क्षमा जोशी यांच्यासह प्रमोद दुबे, आमिर खान, अंकुर चावला, अमित देसाई, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद, अमन लेखी, संदीप कपूर, रायन करंजेवाला आणि श्रीकांत शिवदे यांचेही सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच न्यायालयाच्या कठोर, निःपक्षपाती आणि न्यायिक खटल्याबद्दल आणि सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील इतर अनुभवजन्य सामग्रीची सखोल तपासणी केल्याबद्दल गोवा पोलिसांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

अ‍ॅड. शेन गोम्स
तेजपाल यांनी मानले अ‍ॅड. राजीव गोम्स यांचे आभारयावेळी तरुण तेजपाल यांच्या वतीने एक प्रेसनोट रिलीज करण्यात आली. तेजपाल यांची मुलगी तारा हिने ही प्रेसनोट माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर सादर केली. यात तरुण तेजपाल असे म्हणतात की, गेली साडेसात वर्षे माझ्या कुटुंबासाठी क्लेशदायक ठरली आहेत. भविष्यात योग्य वेळी मी एक व्यापक विधान करेन, असे सुतोवाच तेजपाल यांनी केले आहे. तर गेल्या आठवड्यात माझे वकील अ‍ॅड. राजीव गोम्स यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. माझे आयुष्य आणि प्रतिष्ठा मला परत मिळवून देण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या एवढा कठोर लढा कौशल्यपूर्णतेने दिला नसता. राजीव गोम्स यांचे आमच्यावर मोठे आणि कायमस्वरूपी कर्ज राहणार आहे. राजीवची पत्नी चेरिल आणि मुलगा शेन यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कुठलाच अशील राजीवपेक्षा चांगल्या वकिलाची आशा करू शकत नाही. न्यायासाठी लढणारा एक सच्चा प्रतिनिधी आम्ही गमावला, असे त्याने म्हटले आहे.
तेजपाल खटल्याचा ऐतिहासिक निकाल
Last Updated : May 22, 2021, 10:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details