नवी दिल्ली -काँग्रेसला लागलेली गळती नवी नाही. मात्र या गळतीवर नजर टाकली तर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असलेले आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज मंडळीनी काँग्रेसची साथ सोडली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर याची सुरुवात झाली. ही गळती अजूनही थांबल्याचे दिसत नाही. 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या तब्बल 170 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला. ही आकडेवारी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालामधून समोर आली आहे.
काँग्रेसच्या तुलनेत भाजपामधून मात्र फक्त 18 आमदारांनी बाहेरची वाट धरली आहे. 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये 405 आमदारांनी निवडणूक लढवल्या. यात 182 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर 38 आमदारांनी काँग्रेस आणि 25 आमदारांनी तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाची वाट धरली. याचबरोबर 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या 5 आमदारांनी सोडचिठ्ठी दिली. तर काँग्रेसच्या 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला.