महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

MLA Criminal Background in Goa : 2017 पेक्षा 2022 मध्ये गोव्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अधिक आमदार; पाहा रिपोर्ट - गोवा आमदार ऐडीआर रिपोर्ट

गोवा विधानसभा 2022 निवडणुकीच्या (Goa Election Result 2022) निकालानंतर ADR रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला आहे. यात जिंकलेल्या किती उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, किती उमेदवार करोडपती आहेत, तसेच या उमेदवारांचे शिक्षण किती झाले आहे याबाबतची माहिती या रिपोर्टमध्ये दिली आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे ही सर्व माहिती प्राप्त झाली आहे.

goa adr report
गोवा ADR रिपोर्ट

By

Published : Mar 12, 2022, 5:13 PM IST

Updated : Mar 12, 2022, 5:49 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) मध्ये भाजपने घवघवीत यश प्राप्त केले आहे. गोव्यात भाजपला 20 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना 3, आम आदमी पार्टीला 2, महाराष्ट्रवादी गोमंतकला 2, गोवा फॉरवर्ड पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.

ADR रिपोर्टची आकडेवारी

दरम्यान, गोवा विधानसभा 2022 निवडणुकीच्या (Goa Election Result 2022) निकालानंतर ADR रिपोर्ट आज जाहीर करण्यात आला आहे. यात जिंकलेल्या किती उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, किती उमेदवार करोडपती आहेत, तसेच या उमेदवारांचे शिक्षण किती झाले आहे याबाबतची माहिती या रिपोर्टमध्ये दिली आहे. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे ही सर्व माहिती प्राप्त झाली आहे. या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊयात जिंकलेले किती उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे (MLA Criminal Background in Goa) आहेत ते....

  • सर्वसाधारण स्वरुपाचे गुन्हे -

गोवा विधानसभा 2022 मध्ये जिंकलेल्या 40 उमेदवारांपैकी 16 (40 टक्के) उमेदवारांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. तर 2017 निवडणुकीतील 9 (23 टक्के) उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. 2017 च्या आकडेवारीचा विचार करता 2022 मधील उमेदवारांवर गुन्हे दाखल असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

  • गंभीर स्वरुपाचे गुन्हे -

2022 विधानसभेतील जिंकलेल्या उमेदवारांपैकी 13 (33 टक्के) उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर 2017 मध्ये 40 पैकी 6 उमेदवारांवर (15 टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. 2017 च्या आकडेवारीचा विचार करता 2022 मधील जिंकलेल्या उमेदवारांवर अधिक प्रमाणात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे दिसून येत आहे.

ADR रिपोर्टची आकडेवारी
  • महिला अत्याचाराविरोधातले गुन्हे -

2022 निवडणुकीत जिंकलेल्या 40 उमेदवारांपैकी 2 जणांवर महिला अत्याचाराविरोधातले गुन्हे दाखल आहेत. तर त्यातील एकावर तर बलात्कार म्हणजेच कलम 376 चा गुन्हा दाखल आहे.

  • कोणत्या पक्षात किती जिंकलेल्या उमेदवारांवर गुन्हे दाखल -

भाजप - 20 पैकी 7 जणांवर गुन्हे

काँग्रेस - 11 पैकी 7 जणांवर गुन्हे

गोमंतक - 2 पैकी 1 जणावर गुन्हा

गोवा फॉरवर्ड - 1 उमेदवारावर गुन्हा

ADR रिपोर्टची आकडेवारी
  • कोणत्या पक्षात किती उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

भाजप - 20 पैकी 6 जणांवर गंभीर गुन्हे

काँग्रेस - 11 पैकी 6 जणांवर गंभीर गुन्हे

महाराष्ट्रवादी गोमंतक - 1 जणावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे

Last Updated : Mar 12, 2022, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details