महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आदित्य ठाकरे आज मथुरा दौऱ्यावर, 'या' प्रसिद्ध मंदिराचं करणार उद्घाटन - वल्लभाचार्य

Aditya Thackeray in Mathura : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त उत्तर प्रदेशातील मथुरा इथं जाणार आहेत. या दौऱ्यात ते ठाकूर श्यामा श्याम या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत

आदित्य ठाकरे आज मथुरा दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आज मथुरा दौऱ्यावर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 10:54 AM IST

Updated : Nov 27, 2023, 1:57 PM IST

लखनऊ Aditya Thackeray in Mathura : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते तथा महाराष्ट्राचे माजी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज उत्तर प्रदेशातील मथुरा इथं ठाकूर श्यामा श्याम या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. पाचशे वर्षे जुन्या असलेल्या या मंदिराचं नुकतंच सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलंय.

निवेदनाद्वारे दिली माहिती : ठाकरे गटाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली. आदित्य ठाकरे मथुरेतील कृष्णजन्मभूमी मंदिर आणि बांके बिहारी मंदिरासह अन्य महत्त्वाच्या मंदिरांनाही भेट देणार आहेत. तसंच यावेळी मथुरेत आदित्य ठाकरे 500 वर्षे जुन्या ठाकूर श्यामा श्यामजी मंदिराचं सुशोभीकरण आणि नुतनीकरणानंतर उद्घाटन करणार आहेत.

खासदार चतुर्वेदी यांच्या प्रयत्नातून मंदिराचा जिर्णोद्धार : मथुरच्या श्याम घाटावर असलेल्या ठाकूर 'श्यामा श्याम' या प्राचिन मंदिराचा नुकताच चतुर्वेदी यांच्या प्रयत्नातून एनआर अल्लुरीच्या नागार्जुन फाऊंडेशनच्या मदतीनं जीर्णोद्धार करण्यात आला, असं निवेदनात म्हटलंय. या मंदिराची स्थापना वल्लभाचार्य (1479-1531) यांनी 16व्या शतकाच्या सुरुवातीला केली होती आणि विठ्ठलनाथांसारख्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्याचा विस्तार केला होता, असंही या निवेदनात म्हटलंय.

अष्ट सखा श्री चीत स्वामींनी बांधलं होतं मंदिर : खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, अष्ट-सखा नावाच्या श्री चेत स्वामीजींनी हे मंदिर बांधलं. जे अष्ट-सखाच्या जोडप्याला समर्पित आहे. त्याची देखभाल चीत स्वामी घराण्यानं (नाथद्वारातील बांके बिहारीप्रमाणे) केलीय. प्रत्येक वैष्णवांच्या 84 कोसी ब्रज यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा हा भाग आहे. पुष्टीमार्ग परंपरेत समाविष्ट असलेलं हे मंदिर, वैष्णव धर्मातील वल्लभ संप्रदाय म्हणूनही ओळखलं जातं. रुद्र संप्रदायाच्या उप-परंपरा म्हणून या मंदिराला एक अद्वितीय स्थान आहे. हे मंदिर आता पूर्ण झालं असून मथुरा या पवित्र शहरात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूमिका बजावत राहणार आहे. हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचं खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. Aditya Thackeray banner : आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री; नागपुरात कार्यकर्त्यांनी झळकवले बॅनर
  2. Aaditya Thackeray Telangana Visit : आदित्य ठाकरेंचा तेलंगाणा दौरा; मंत्री केटीआर यांची घेतली भेट
Last Updated : Nov 27, 2023, 1:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details