मुंबई :सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. अदानी समूहाने पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचे सांगितले आहे. अदानी एंटरप्रायजेसने नुकतेच इपीओ जारी केले होते. यामध्ये 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र बुधवारी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे वचन : कंपनीने 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ जारी केला होता. हा एफपीओ 27 जानेवारीला उघडला होता. तर 31 जानेवारीला त्याची क्लोजिंग डेट होती. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अदानी ग्रुपने अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि गुंतवणूकदारांना त्यांचे सर्व पैसे परत करणार असल्याचे वचन दिले.
शेअर 1008 रुपयांनी घसरला :बुधवारी इंट्राडे ट्रेडमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा शेअर जवळपास 30 टक्क्यांनी घसरला. बुधवारी शेअर्स बीएसईवर 3030 रुपयांवर उघडला. यानंतर दिवसाच्या व्यवहारात शेअर 1,941.2 रुपयांपर्यंत घसरला. म्हणजेच, दिवसाच्या उच्चांकावरून जवळपास 1000 रुपये म्हणजेच 30 टक्क्यांनी घसरण झाली होती. तथापि, बाजार बंद होण्याच्या वेळी, शेअर्समध्ये थोडीशी रिकव्हरी झाली आणि बीएसईवर स्टॉक28.45 टक्के खाली 2128.75 रुपयांवर बंद झाला. यासह अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप 2,42,672.04 कोटी रुपयांवर आला आहे.
गुंतवणूकदारांच्या विश्वासाबद्दल धन्यवाद : मंगळवारी, अदानी एंटरप्रायझेसनच्या एफपीओ सबस्क्रिप्शनचा शेवटचा दिवस होता. सबस्क्रिप्शनसाठी फॉलो-ऑन पब्लिक ऑफर बंद झाल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स झपाट्याने घसरले. अदानी एंटरप्रायझेसचा रोख प्रवाह आणि सुरक्षित मालमत्तेसह अतिशय निरोगी आहे. भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. दीर्घकालीन मूल्यावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवू. पुन्हा एकदा बाजार स्थिर झाल्यावर, आम्ही आमच्या धोरणाचे पुनरावलोकन करू. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला तुमचा पाठिंबा मिळत राहील. आमच्यावरील तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद, असे पुढे म्हणाले आहेत. आम्ही आमच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) सोबत काम करत आहोत. आम्हाला मिळालेले पैसे परत करावे लागतील. गुंतवणूक दारांनी जेवढे पैसे त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील.
हेही वाचा :Mukesh Ambani Forbes Top 10 List: श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत अंबानींनी अदाणींना टाकले मागे.. टॉप १० मध्ये 'या' स्थानी