मोहाली: भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) सध्या मोहालीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ( India vs Australia T20 Series ) तो पंजाबमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली ( Anushka emotional post for Virat ) आहे. अनुष्का पती विराटला खूप मिस करत असल्याचे या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. या पोस्टवर विराटने देखील रिप्लाय दिला आहे.
अनुष्काची विराटसाठी भावनिक पोस्ट ( Anushka emotional post for Virat Kohli ) -
अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Actress Anushka Sharma ) विराटसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा तुम्ही या ठिकाणी किंवा हॉटेलच्या बायो-बबलमध्ये या व्यक्तीसोबत असता, तेव्हा जग अधिक रोमांचक, मजेदार आणि सुंदर दिसते.' त्यासोबत तिने हॅशटॅगमध्ये लिहिले – मिसिंग हबी पोस्ट. याशिवाय हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
विराटच्या रिप्लाय हजारो लाईक्सचा पाऊस -