हैदराबादSouth Actor Vishal:साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विशाल कृष्णा रेड्डी यानी आज एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर मार्क अँटोनीच्या हिंदी सेन्सॉरसाठी लाच मागितल्याचा आरोप केलाय. या व्हिडिओद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलंय.
हिंदी डब व्हर्जनची योजना : मार्क अँटनी हा तमिळ चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत आहे. 15 सप्टेंबरला रिलीज झालेला हा सुपरस्टारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. निर्माते चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनची योजना करत होते. या संदर्भात सर्व काही ठीक चाललं होते, परंतु या सगळ्या दरम्यान चित्रपट अभिनेता विशालनं सीबीएफसीवर मार्क अँटनी हिंदी सेन्सॉर करण्यासाठी 6.5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केलाय.
हिंदी आवृत्तीसाठी 6.5 लाख रुपये :अभिनेता विशालने त्याच्या 'X' या अधिकृत समाज माध्यमावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की, 'रुपेरी पडद्यावर भ्रष्टाचार दाखवणं ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात तो पचत नाही. मार्क अँटनी या माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मला 6.5 लाख रुपये मोजावे लागले. व्यवहारासाठी आणि स्क्रीनिंगसाठी 3 लाख आणि प्रमाणपत्रासाठी 3.5 लाख रुपये मोजावे लागले आहेत. माझ्या कारकिर्दीत कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. आज चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे संबंधित मध्यस्थाला पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण जास्त पैसे पणाला लागले होते.
सत्याचा विजय होईल :विशालने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करून म्हटलंय की, 'मी ही बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहे. मी हे माझ्यासाठी नाही, तर भविष्यातील निर्मात्यांसाठी करत आहे. माझा कष्टानं कमावलेला पैसा भ्रष्टाचारात गेला आहे का? असा प्रश्न त्याने विचारलाय. नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल अशी आशा आहे, अशी पोस्ट शेअर करत विशालने शेवटी बँक व्यवहाराचा तपशीलही शेअर केला आहे. दरम्यान, याबाबत सीबीएफसीकडून आरोपाबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
- दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नाणी साईचरणी नतमस्तक....
- south Actor Brahmanandam : दाक्षिणात्य अभिनेता ब्रह्मानंदम यांनी भाजप नेते के सुधाकर यांच्यासाठी केला प्रचार
- Sharwanand Engagement : अभिनेता शरवानंद अडकला लग्नाच्या बेडीत, रक्षितासोबतचे केले फोटो शेअर