कोलकाता : गुरुवारी संध्याकाळी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन (Kolkata International Film Festival) केले. (Kolkata International Film Festival inauguration). या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता महेश बाबू, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनीही हजेरी लावली होती. अधिकृत वेबसाइटनुसार, पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे आयोजित कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 28 वी आवृत्ती कोलकाता येथे 15 ते 22 डिसेंबर 2022 दरम्यान होणार आहे.
माझ्यावर नकारात्मकतेचा परिणाम होत नाही : यावेळी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान म्हणाला, "नकारात्मकतेचा सोशल मीडियावर वावर वाढला आहे. परंतु त्याच्यासारख्या व्यक्तीवर या नकारात्मकतेचा प्रभाव पडत नाही. सोशल मीडिया बर्याचदा विशिष्ट संकुचित दृष्टीकोनातून चालतो जो मानवी स्वभावाला त्याच्या मूलभूत स्वार्थापुरता मर्यादित करतो. जग काहीही म्हणो, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील". शाहरुखने सोहळ्याला काळ्या रंगाचा थ्री-पीस सूट घातला होता, तर राणी मुखर्जी देखील सोहळ्याला काळ्या रंगाच्या सुंदर साडीत आली होती.