मुंबई -अभिनेतारणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज (दि. 14 एप्रिल)रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. आलिया आणि रणबीरचे चाहतेच नव्हे तर दोन्ही कुटुंबही या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. (Actor Ranbir and actress Alia) लग्नाच्या तारखेबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, 13 एप्रिलच्या रात्री रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी लग्न आज होणार असल्याचा खुलासा केला आहे.
संध्याकाळी शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा - आलिया आणि रणबीरचा काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पूजा आणि मेहंदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंबासह निवडक बॉलिवूड लोक उपस्थित होते. त्यांनतर आज सकाळी हळद, चुडा सोहळा होणार असून संध्याकाळी शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा सुरू होईल.
रणबीर कपूरच्या आईची माहिती -आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये आज आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत.
लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील - आज सकाळी 9 वाजल्यापासून हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कुटुंबातील सदस्य वधू आणि वर दोघांना हळद लावतील. यानंतर आलियाला चुडा घातला जाईल. हे विधी पूर्ण झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरू होईल. रणबीर कपूरची वरात मुंबईतील चेंबूर येथील कृष्णा राज बंगला (आरके हाऊस) ते टोनी पाली हिल परिसरात असलेल्या आलियाच्या 'वास्तू'पर्यंत जाईल. संपूर्ण कपूर कुटुंब वास्तूमध्ये येणार. हे दोन्ही बंगले एक किलोमीटरहून कमी अंतरावर आहेत. येथे लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील. कपूर कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा आहे, ज्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.