चेन्नई -रजनीकांत यांना गुरूवारी त्यांच्या शरीराच्या नियमित तपासणीसाठी चेन्नईच्या अलवरपेट येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील २४ तास ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
अभिनेता रजनीकांत रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थीर असल्याची कुटुंबीयांची माहिती - etv bahart live
अभिनेते रजनीकांत यांनी दरवर्षी संपूर्ण शरीर तपासणीसाठी रुग्णालयात जातात. पुढील औषधे आणि तपासणी ठरलेली असते. ते गुरूवारी चेन्नईच्या अलवरपेट येथील कावेरी रुग्णालयात दाखल झाले.
अभिनेते रजनीकांत हे दरवर्षी संपूर्ण शरीर तपासणीसाठी रुग्णालयात जातात. पुढील औषधे आणि तपासणी ठरलेले आहेत. काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांना दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा आगामी चित्रपट 'अन्नत्ते' 4 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -मुंबई शेअर बाजारात 1159 अंशाने पडझड; गुंतवणुकदारांचे 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात!