नवी दिल्ली : अभिनेता अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी सकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. अजय स्वरूप, अध्यक्ष म्हणाले, कपूर यांना छातीच्या समस्येमुळे दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉ. सुशांत वट्टल यांच्या नेतृत्वाखाली कार्डिओलॉजीमध्ये विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली.
अन्नू कपूर यांना छातीत जळजळ : मीडिया संस्थेशी बोलताना अन्नू कपूरचे मॅनेजर सचिन यांनी सांगितले की, अन्नू कपूर यांना छातीत जळजळ होत होती. त्यामुळे त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता. सध्या या त्यांना तज्ञ डॅाक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आज पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. अन्नू कपूर जेवत आहे, सर्वांशी बोलत असल्याचे ते म्हणाले.
100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम :अन्नू कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 'हम', 'एक रुका हुआ फैसला', 'राम लखन', 'घायल', 'हम किसी से कम नहीं', 'ऐतराज', '7 खून माफ', 'जॉली एलएलबी 2', यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विकी डोनर' या विनोदी नाटकातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अन्नु कपूर यांनी 1979 साली रंगमंचावर कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 22-23 व्या वर्षी या अभिनेत्याने 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेने त्यांना प्रसिद्ध मिळाली होती. अभिनेता असण्यासोबतच अन्नू गायक, दिग्दर्शक, रेडिओ जॉकी आणि टीव्ही होस्ट शो देखील होस्ट करतात. त्यांनी 100 हून अधिक चित्रपट तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
रेडिओ जॉकी म्हणुन प्रसिद्ध :अभिनयाव्यतिरिक्त अन्नू कपूर 'सुहाना सफर विथ अन्नू कपूर' हा रेडिओ शो देखील करतात. या शोची टॅगलाइन आहे - फिल्म दुनियाकी अनकही कहानी. त्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, टीव्ही अकादमी पुरस्कारही जिंकले आहेत.
हेही वाचा -Sharwanand Engagement : अभिनेता शरवानंद अडकला लग्नाच्या बेडीत, रक्षितासोबतचे केले फोटो शेअर