महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार! दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई - दिल्लीत हनुमान जयंतीची दंगल बातमी

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे (दि. १६ एप्रिल)रोजी हनुमान जयंती मिरवणुकीत दोन गटांतील सदस्यांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये दगडफेक झाली. ( Jahangirpuri violence In Delhi ) त्यानंतर येथे मोठी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या संघर्षात सहभागी असलेल्या पाच दोषींवर मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला आहे.

जहांगीरपुरी हिंसाचार!
जहांगीरपुरी हिंसाचार!

By

Published : Apr 20, 2022, 8:06 AM IST

Updated : Apr 20, 2022, 12:22 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती मिरवणुकीत दोन गटांच्या सदस्यांमध्ये झालेल्या संघर्षात सहभागी असलेल्या पाच दोषींवर मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्यात आला, असे उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. जहांगीरपुरी हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल अन्सार, सलीम, इमाम शेख उर्फ ​​सोनू, दिलशाद आणि अहिर यांच्यावर एनएसए लागू करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना जहांगीरपुरी हिंसाचारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर एक दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली.

परिस्थिती तणावपूर्ण झाली - शाह यांनी अस्थाना यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या संभाषणात आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या घटनेबाबत त्यांच्यासमोर सादर केलेल्या अहवालात मार्गदर्शन केले होते. शनिवारी, गृहमंत्र्यांनी अस्थाना आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देपेंद्र पाठक यांच्याशीही या घटनेबद्दल बोलले आणि त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले. उत्तर-पश्चिम दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे संध्याकाळी हनुमान जयंती मिरवणुकीत दोन समुदायांच्या सदस्यांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दगडफेक आणि गोंधळ झाल्यानंतर येथे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती दिली - जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवर नोंदवलेल्या एफआयआरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त शांततापूर्ण शोभा यात्रा निघाली आणि वाद वाढल्याचा उल्लेख आहे. त्यातून दगडफेक झाली. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाचा तपास पोलिसांच्या 14 पथके करत आहेत.

स्थानिक पोलिसांचे 14 पथक तपास करत आहेत - जिगीरपुरी पोलीस अधिकाऱ्याने मांडलेल्या बाजूवर नोंदवलेल्या एफआयआयमध्ये हनुमान जयंती शांती शोभा यात्रा निघाली त्यावेळी हा दंगा सुरू झाल्याचा उल्लेख आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचा तपास स्थानिक पोलिसांचे 14 पथक तपास करत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बारीक नजर - आठ पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकासह नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या संदर्भात आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलीस आयुक्त म्हणाले, की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बारीक नजर ठेवली जात आहे. त्यावर चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदे दिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

एकूण 21 जणांना अटक - फॉरेन्सिकच्या चार पथकांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांचे 14 पथके वेगवेगळ्या कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास प्राथमिक टप्प्यात आहे. एकूण 21 जणांना अटक करण्यात आली आहे, तर काहीजण रिमांडवर आहेत," असे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

12 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - या प्रकरणातील एकूण 14 आरोपींना रविवारी रोहिणी कोर्टात हजर करण्यात आले, त्यानंतर न्यायालयाने अन्सार आणि अस्लम या दोन प्रमुख आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित 12 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यन, "आम्ही सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. यामध्ये चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांचा बंदोबस्त कमी केला जाईल - आरोपींकडून तीन बंदुक आणि पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत, तीन बंदुक जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर जहांगीरपुरी परिसरात निर्बंध लादण्यात आले आहेत. परिस्थिती सुधारल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त कमी केला जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा -Today Petrol-Diesel Rates : महागाई पर्व! पेट्रोल-डिझेल दरात स्थिरता; वाचा आजचे दर

Last Updated : Apr 20, 2022, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details