भोपाळ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर धमकावल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी मध्य प्रदेशातील छतरपूर येथून दोन तरुणांना अटक केली आहे, याआधीही गुजरात पोलिसांनी मध्यप्रदेशच्या सतना येथून दोघांना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. यासोबतच गुजरात पोलिसांनी इतर ठिकाणीही छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतले आहे. गुजरात पोलिसांनी पकडलेले आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना धमकावत होते, त्यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाने गुजरातमधील लोकांना घरीच राहा, सुरक्षित राहा, असा संदेश पाठवून धमकी दिली होती.
आरोपींनी पंतप्रधान मोदींना सोशल मीडियावर धमकीचे संदेश तसेच सातत्याने आक्षेपार्ह लिखान केले होते, या प्रकरणात अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने आधीचे रेकॉर्ड केलेले संदेश शोधून तपासले. धमक्यांच्या तक्रारीनंतरच अहमदाबाद शहर गुन्हे शाखा अलर्ट मोडवर आली होती, त्यानंतर गुजरात पोलिसांनी देशाच्या कानाकोपऱ्यात छापे टाकले आणि मध्य प्रदेशातील काही लोकही या प्रकरणी पुढे आले. सध्या गुजरात पोलिसांनी आरोपींना अटक करून सोबत नेले आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मध्ये खलिस्तानी दहशतवाद्याच्या नावाने धमकी देणाऱ्यांना सायबर क्राईमने मध्यप्रदेशातील राहुल कुमार द्विवेदी आणि नरेंद्र कुशवाह यांना नुकतीच अटक केली आहे. त्यांना मध्य प्रदेशातील सतना येथे पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून 1 कडून 168 सिम कार्ड आणि 5 राउटर आणि 6 मोबाईल फोन 1 सिम बॉक्ससह जप्त केले होते. द्विवेदी हा तांत्रिकदृष्ट्या पारंगत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सायबर क्राईमने छापा टाकून दोघांना अटक केली.