महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रेमडेसिवीरमध्ये ग्लुकोज भरून वीस हजाराला विकणारे पाच जण ताब्यात

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजर सुरूच आहे. इंदूर येथील लसूडीया पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये ग्लूकोज भरुन विकणाऱ्या दोघांना तर गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे.

By

Published : Apr 25, 2021, 3:31 PM IST

Updated : Apr 25, 2021, 8:49 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

इंदूर (मध्यप्रदेश) -देशभरात रेमडेसिवीरसाठी राजकारण पेटताना दिसत आहे. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे या इंजेक्शनची साठेबाजी करणे, अवाच्या सवा दराने विकत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, मध्यप्रदेशच्या इंदूरमधअये रेमडेसिवीरच्या व्हाइलमध्ये ग्लुकोज भरून विकेल जात होते. या प्रकरणी लसुडिया पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

आरोपीला ताब्यात घेताना

ग्लूकोज भरुन विकत होते 20 हजार रुपयांला एक रेमडेसिवीर

एका व्यक्तीने उपचारासाठी संबंधितांकडून रेमडेसिवीर वीस हजार रुपयांना खरेदी केले. त्यानंतर ती व्यक्ती रुग्णालयात इंजेक्शन घेऊन पोहोचली. मात्र, डॉक्टरांनी यामध्ये ग्लुकोज आहे, असे सांगितले. संतापलेल्या व्यक्तीने लसुडिया पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत लसुडिया पोलिसांनी उज्ज्वल पटेल व अमित अवस्थी या दोघांना ताब्यात घेतले तर उर्वरीत तीन आरोपींच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -रेमडेसिवीर बाहेर विकून रुग्णाला दिले सलाईन वॉटर; यूपीच्या रुग्णालयातील प्रकार

Last Updated : Apr 25, 2021, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details