मथुरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो कचऱ्यात टाकल्याप्रकरणी काढल्याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 16 जुलै रोजी मथुरा-वृंदावन महापालिकेने सफाई कर्मचाऱ्याला बडतर्फ ( Accused Sweeper Dismissed ) केले होते. या कारवाईचा कर्मचारी संघटनेने निषेध केला होता. १९ जुलै रोजी या सफाई कामगाराची सेवा पूर्ववत करून बडतर्फीचा आदेश रद्द करण्यात आला. गेल्या आठवड्यात याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. देश पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांचे फोटो कचऱ्यात पाहून राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी संताप व्यक्त करीत हा व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर हे प्रकरण चर्चेचा विषय बनले होते.
चुकून झालेली कृती - याप्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त सत्येंद्र तिवारी यांनी सांगितले की, त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. सफाई कामगार बॉबी हा सुभाष इंटर कॉलेजजवळ कचरा गोळा करत होता. चुकून त्याने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटो गाडीत टाकला. स्थानिक लोकांनी अडवले तेव्हा सफाई कामगाराला कळले की हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. सफाई कामगाराने तातडीने ती छायाचित्रे कचऱ्यातून काढली.