बरेली (उत्तर प्रदेश) - बरेली येथील एका पीडित कुटुंबाने घरातील लहान मुलाची गळा दाबून हत्या करणाऱ्या आणि नंतर त्याला झाडाला लटकवणाऱ्या 26 वर्षीय आरोपीला बेदम मारहाण करत त्याचा खून केला.
हा गुन्हा केल्यावरच आरोपी फरार झाला होता आणि स्थानिक पोलिसांनी त्याच्याविषयी माहिती पुरवणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी अनेक ठिकाणी आरोपीची पोस्टर्सही लावली होती.
दरम्यान, मृत मुलाच्या कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी आरोपी प्रेमपालला पकडले आणि पोलीस येण्यापूर्वीच त्याला दांडकी आणि विटांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यानंतर प्रेमपालला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा -तांत्रिकाच्या बोलण्याला फसून स्वतःच्या मुलीची हत्या केल्या प्रकरणी एकाला अटक केली
बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) रोहितसिंग सजवान यांनी पत्रकारांना सांगितले की, 'चार वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याप्रकरणी प्रेमपालचा शोध सुरू होता. त्याला बुधवारी ओन्ला भागात काही लोकांनी मारहाण केली. त्यात तो ठार झाला. आम्ही या प्रकरणात दोन लोकांना अटक केली आहे आणि हे दोघे मुलाचे नातेवाईक आहेत. दोन आरोपी आणि अनेक अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमपाल बरेली जिल्ह्यातील ओन्ला येथे लपून बसला होता. घरातून खेळायला बाहेर गेलेला 4 वर्षांचा मुलगा 13 जुलैला बेपत्ता झाला होता. सर्वांत शेवटी हा मुलगा प्रेमपालसोबत खेळताना आढळला होता. प्रेमपाल एक दिवस आधीच काही नातेवाईकांसोबत त्यांच्या घरी आला होता. सुरुवातील घरच्यांना वाटले की, प्रेमपालने खंडणीसाठी मुलाचे अपहरण केले आहे. मात्र, काही तासांनंतर त्यांना मुलाचा मृतदेह गावाच्या बाहेर झाडावर लटकलेला आढळला. शवविच्छेदन तपासणीत या मुलावर लैंगिक अत्याचारा झाल्याचे स्पष्ट झाले आणि प्रेमपाल बेपत्ता झाला होता.
त्याच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम 302, 37, 364, 201 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4/5 अन्वये प्राथमिक तक्रार नोंदविली होती.
हेही वाचा -उत्तर प्रदेशात उसाच्या शेतात सापडले नवजात अर्भक