मथुरा -ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच आता मथुरेच्या श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातही व्हिडिओग्राफी सर्वेक्षण होणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. मुख्य पक्षकार मनीष यादव यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती पीयूष अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. जिल्हा न्यायालयाला व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण करून चार महिन्यांत उच्च न्यायालयात अहवाल सादर करावा लागणार आहे. allahabad high court order एक वरिष्ठ वकिलांची आयुक्तपदी तर दोन वकिलांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान फिर्यादी व प्रतिवादी यांच्यासोबत सक्षम अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
हा आदेश उच्च न्यायालयाने मथुरा जिल्हा न्यायाधीशांना दिला आहे. लखनौ येथील रहिवासी रंजना अग्निहोत्री यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारा दावा दाखल केला होता. तसेच, श्रीकृष्ण जन्मभूमीत बांधलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. कोर्टात दाखल केलेल्या दाव्यात भगवान कृष्णाच्या जन्मस्थानाजवळील कटरा केशव देव मंदिराच्या 13.37 एकर परिसरात मुघल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार 1669-70 मध्ये बांधलेली कथित मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
ज्ञानवापी मशीदचेही झाले होते सर्वेक्षण - ज्ञानवापी मशीद औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून बांधली असा दावा अनेकांनी केला आहे. हा मंदिर-मशीद वाद वर्षानुवर्षे जुना असून (213) वर्षांपूर्वी त्यावरून दंगली झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर या मुद्द्यावरून दंगल झाली नाही. ( Gyanvapi Masjid ) अयोध्येत राम मंदिराचा मुद्दा तापल्यानंतर (1991) मध्ये ज्ञानवापी हटवून त्याची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला द्यावी यासाठी दाखल करण्यात आलेली पहिली याचिका दाखल करण्यात आली होती.