मथुरा :जिल्ह्यातील नोएडा आग्रा यमुना द्रुतगती मार्गावर काल सोमवार रात्री उशिरा अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध पडला. यानंतर तो रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव कारच्या धडकेत आला, त्यानंतर कारने मृतदेह तब्बल 11 किलोमीटरपर्यंत ओढून नेला. यादरम्यान कार मात टोल प्लाझाजवळ पोहोचली तेव्हा तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना कारखाली मृतदेह अडकल्याचे दिसले. मृतदेह पूर्णपणे विकृत झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह कारखालून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहिले : वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा चारचाकीखाली एक मृतदेह अडकला होता. जे मात टोल प्लाझावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाहिले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, घटनेतील वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
कार चालकाला अटक : वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, कार चालकाने पोलीस चौकशीत सांगितले की, तो पत्नीसोबत आग्राहून नोएडाला येत होता. यादरम्यान या तरुणाचा मृतदेह गाडीखाली कधी आला, हे त्याला कळलेही नाही. मात्र, या प्रकरणाच्या तपासासोबतच पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्णपणे विकृत झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह कारखालून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. कार चालकाला अटक करण्यात आली आहे.