महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Singer Alfaaz Admitted Hospital : पंजाबी गायक अल्फाजचा अपघात ; मोहाली खासगी रुग्णालयात दाखल - Accident of Punjabi Singer Alfaz

पंजाबी गायक अल्फाज उर्फ ​​अमनजोत सिंग पनवार याला शनिवारी येथील स्थानिक ढाब्यावर एका वाहनाने धडक दिल्याने जखमी अवस्थेत त्याला मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री सहकारी पंजाबी गायकाने अल्फाज "धोक्याच्या बाहेर" असल्याचे सोशल मीडियावर सांगितले.

Punjabi singer Alfaz  Amanjot Singh Panwar
पंजाबी गायक अल्फाज उर्फ ​​अमनजोत सिंग पनवार

By

Published : Oct 3, 2022, 11:25 AM IST

Updated : Oct 3, 2022, 11:45 AM IST

मोहाली (पंजाब) :पंजाबी गायक अल्फाज उर्फ ​​अमनजोत सिंग पनवार याला शनिवारी येथील स्थानिक ढाब्यावर एका वाहनाने धडक (Accident of Punjabi Singer) दिली. जखमी अवस्थेत त्याला मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात (Alfaz Admitted to private hospital in Mohali) आले. रविवारी रात्री सहकारी पंजाबी गायकाने अल्फाज "धोक्याच्या बाहेर" असल्याचे सोशल मीडियावर सांगितले.

गाडीची गायकाला धडक -वृत्तानुसार, 'यार बथेरे' गायक जो पाल ढाबा सोडून त्याच्या तीन मित्रांच्यासोबत निघाला होता. तो भोजनालयातील विकी नावाच्या एकामाजी कर्मचारी मालकाशी झालेल्या वादात अडकला होता. वृत्तानुसार, विकीने अल्फाजला मध्यस्थी करण्याची विनंती केली. आणि ढाबा मालकाला त्याची थकबाकी सोडवायला सांगितली. गायकाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्याने विकीने मालकाचा टेम्पो घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि गाडी उलटत असताना गायकाला धडक (Singer Alfaaz Admitted Hospital) दिली.

सोहना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -गायकाच्या डोक्यावर, हाताला आणि पायाला अनेक जखमा झाल्या. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. विकी, संशयित ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाला. पण नंतर त्याला मोहाली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलीसांनी सोहना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हनी सिंगची पोस्ट -सहकारी पंजाबी गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन, हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत 'हे मेरा दिल' कॅप्शन देत गायकाचा फोटो शेअर केला. 'माझ्या भावावर @itsaslialfaaz काल रात्री हल्ला झाला आहे, ज्याने या ----सर्वांनी कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा.' अशी पोस्ट केली होती. नंतर त्याने पोस्ट हटवपोस्ट हटवल्यानंतर काही तासांनंतर, यो यो हनी सिंगने आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने अल्फाजचे आरोग्य अपडेट शेअर केले आणि 'अल्फाजला रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरने धडक देणाऱ्या गुन्हेगारांना पकडले आहे, मोहाली पोलिसांचे विशेष आभाऱ'. @itsaslialfaaz अल्फाज आता धोक्याच्या बाहेर आहे, असे (Accident of Punjabi Singer Alfaz) लिहिले.

अल्फाजची प्रसिद्ध गाणी -अल्फाज हा पंजाबी गायक त्याच्या 'पुट्ट जट्ट दा', 'रिक्षा', 'गड्डी' आणि इतर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी ओळखला जातो. गायकाने यो यो हनी सिंगसोबत 'हे मेरा दिल', 'बेबो', 'बर्थडे बॅश' आणि 'यार बथेरे' सारख्या चार्टबस्टर ट्रॅकसाठी सहकार्य केले आहे.

Last Updated : Oct 3, 2022, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details