पुणे- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Mumbai-Pune Express way Accident) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू (Five died on the spot) झाला आहे. लोणावळा लगत असलेल्या भागात सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
Car Accident : पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू - Mumbai-Pune Express way Accident
मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Pune Express way) कार आणि कंटेनर चा भीषण अपघात (Terrible car and container accident ) झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू (Five died on the spot) झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी आठ च्या सुमारास शिलाटने गावाजवळ घडल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे. अपघात येवढा भीषण होता की यात कार अक्षरशः चक्काचूर झाली आहे.
या अपघातात मासी देवी तिलोक (82), सीमा राज (32), शालिमी राज (19), महावीर राज तिलोक (38) आणि चालक रिहांत अन्सारी (26) यांचा जागेवरच मृत्यू झाला. हे सगळे हरियाणा राज्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून पुण्याच्या लेनवरील भरधाव कंटेनरखाली शिरल्याने कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आठ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, इतरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत कार महामार्गावरून बाजूला केली. या भीषण अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.