भोपाळ - मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नाशिकमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. आग्रा-मुंबई महामार्ग ३ वर हा अपघात झाला. जिल्ह्यातील पचोर पोलीस ठाणे क्षेत्रातील उडनखेडी येथे तवेरा कारने कंटेनरला मागून जोराची धडक दिली.
मध्यप्रदेश : कंटेनर व तवेराच्या अपघातात नाशिकमधील चौघांचा मृत्यू - तवेरा कारचा अपघात राजगढ
मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात झालेल्या अपघातात नाशिकमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.
तवेरा कारच्या अपघातात नाशिकमधील चौघांचा मृत्यू
इंदौरच्या दिशेने जात असताना अपघात -
कारमधून सर्वजण इंदौरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना सारंगपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कारमधील सर्वजण नाशिकला निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.