कुड्डालोर (तामिळनाडू) :तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. ( Tamilnadu Major Accident ) त्रिची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर पहाटे सहा वाहनांची धडक झाली. ( Five People Of The Same Family Died ) मृतांच्या कुटुंबीयांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. सर्वजण एकाच गाडीतून प्रवास करत होते. वेप्पूर अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.पुढील तपास सुरू आहे. ( Accident Due To Collision of vehicles In Cuddalore )
या आधीही हनुमानगड परिसरात1 जानेवारी 2023 रोजी सकाळी पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात (Road Accident in Hanumangarh) झाला होता. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Car Truck Collision 5 People Died). या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले होता.