बेंगळुरू ( कर्नाटक ) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी सकाळी राज्यातील अधिकाऱ्यांना धक्का दिला. एसीबीच्या 300 अधिकाऱ्यांच्या पथकाने राज्यभरात 80 ठिकाणी 21 कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर छापे टाकले ( ACB raids 21 government officials houses ) आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे ( Bangalore ACB raid ) टाकले.
त्यांच्या मिळकतीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मालमत्तेवर छापेमारी, सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी कागदपत्र पडताळणी सुरू आहे. एसीबीने बंगळुरूसह 10 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले.