LED स्क्रीनवर शिवीगाळ असलेला व्हिडिओ भागलपूर (बिहार) : बिहारच्या भागलपूर येथील स्टेशन चौकाजवळील टीव्ही स्क्रीनवर अचानक एक व्हिडिओ सुरु झाला ज्यात काही आक्षेपार्ह शब्द लिहिले होते. उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. घटनेची माहिती मिळताच एसडीओ धनंजय कुमार, डीएसपी अजय कुमार चौधरी घटनास्थळी पोहोचले असून आणि त्यांनी तपास सुरू केला आहे.
एलईडी स्क्रीनवर चालला व्हिडिओ : पाटणा रेल्वे स्थानकानंतर भागलपूरच्या स्टेशन चौकातील टीव्ही स्क्रीनवर हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणी डीएसपी म्हणाले की, तांत्रिक कारणांमुळे अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र, या प्रकरणाबाबत घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी तपास पथकाला पाचारण केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्परतेने तपास सुरू केला.
तब्बल 15 मिनिटे चालला व्हिडिओ : लोकांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री उशिरा दहा वाजताच्या सुमारास भागलपूर स्टेशन चौकात असलेल्या भीमराव आंबेडकर पुतळ्याच्या वरील टीव्ही स्क्रीनवर सुमारे 15 मिनिटे अपशब्द असलेला हा व्हिडिओ दिसत होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टीव्ही स्क्रीनवरील स्क्रोलमध्ये अचानक शिवीगाळ सुरू झाली. सुमारे 10 ते 15 मिनिटे हा प्रकार सुरू होता. नंतर लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेवर स्थानिक कन्हैया यादव म्हणाला की, 'मी टीव्ही स्क्रोल अपशब्दांसह हलताना पाहिला. मी याची माहिती कमांडोच्या प्रमुखाला दिली. त्यानंतर तो आला आणि त्याने टीव्ही बंद केला. हे 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ सुरु होते. मी समोरच कोल्ड्रिंक पीत होतो.'
अधिकारी तपासात गुंतले :घटनेची माहिती मिळताच एसडीओ धनंजय कुमार आणि शहर डीएसपी अजयकुमार चौधरी पोलीस फौजफाट्यासह स्टेशन चौकात पोहोचले आणि भीमराव आंबेडकर पुतळ्यावरील टीव्ही स्क्रीन काढून सोबत घेऊन गेले. तपासानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे भागलपूर शहर डीएसपी अजयकुमार चौधरी यांनी सांगितले. 'जे काही घडले आहे त्याची तंत्रज्ञांना बोलावून चौकशी केली जाईल. यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल', असे ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :NCW on Sand Mafia Attack: महिला अधिकाऱ्याला वाळूतस्करांनी केली मारहाण, महिला आयोगाने घेतली दखल, अहवाल मागवला