दिल्ली -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना युपीएमध्ये प्रवेश करेल का? असा प्रश्न आता पुढे आला आहे. त्यावर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. त्यावर, शिवसेनेच्या युपीएत प्रवेशाबाबत येणारा काळ सांगेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत हेही वाचा -Padma Shri Nanda Sir Passes Away : 104 वर्षीय पद्मश्री नंदा सरांचे निधन
2022 मध्ये उत्तर प्रदेश राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होत आहेत. शिवसेना देखील युपीएचा भाग होऊन उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर, आता समीकरणे बनत असून पुढे काय निर्णय घेतले जातील ते पाहावे लागणार. दोन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्येच कळेल की काय निर्णय होतो, असे संजय राऊत म्हणाले.
संसदेतील 12 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातील दोन भाजपचे आहेत, यावर प्रतिक्रिया विचारली असता, संघर्ष सुरू राहील, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा -UP women commission: 17 मुलींवर बलात्काराचा प्रयत्न करण्याचे प्रकरण: महिला आयोगाने प्रशासनाकडून मागविली माहिती