कोलकाता -नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भव्य विजयानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पक्षाचा देशभरात विस्तार करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या एका महिन्यात संपूर्ण योजना मांडणार असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
भाजपवर टीकास्त्र घेताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि डायमंड हार्बरचे खासदार म्हणाले की, जिथे जिथे टीएमसी पाय ठेवेल तिथे भाजपाला पराभूत करेल. एक-दोन आमदार जिंकू असे नाही. तर राज्य जिंकणे आमचे लक्ष्य असणार आहे. बॅनर्जी यांचे कार्य, संघर्ष लोकापर्यंत पोहचवू, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.