महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन लोकसभा निवडणूक लढवणार?, प्रयागराजमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा - अभिषेक बच्चन प्रयागराजमधून लोकसभा निवडणूक

अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता समाजवादी पक्ष अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन याला प्रयागराजमधून लोकसभेचे तिकिट देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Abhishek Bachchan
अभिषेक बच्चन

By

Published : Jul 15, 2023, 6:53 PM IST

लखनौ :शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा व अभिनेता अभिषेक बच्चन लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तो प्रयागराजमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो.

बिग बींनी प्रयागराजमधून निवडणूक लढवली होती : अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये या जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी तत्कालीन लोकदल नेते हेमवती नंदन बहुगुणा यांचा 1 लाख 9 हजार मतांनी पराभव केला होता. सध्या अभिषेक बच्चनच्या आई जया बच्चन समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. अशा परिस्थितीत आता अभिषेक बच्चन प्रयागराजमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असा दावा समाजवादी पक्षाने केला आहे.

रिता बहुगुणा जोशींच्या मुलाचा सपामध्ये प्रवेश : भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रिता बहुगुणा जोशी यांचा मुलगा मयंक जोशी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता रिता बहुगुणा जोशी प्रयागराजमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत आता प्रयागराजचे समीकरण कसे होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रयागराज राजकारणाचा केंद्रबिंदू : प्रयागराज ही जागा गेली अनेक वर्षे राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रिता बहुगुणा जोशी यांनी येथून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीची संधी चालून आली तेव्हा त्यांचा मुलगा मयंक जोशी याने समाजवादी पक्षात प्रवेश केला. अशा स्थितीत रिता बहुगुणा जोशींना आता प्रयागराजमधून भाजपचे तिकीट मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, समाजवादी पक्षाकडून बातमी येत आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन हे भावी उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रयागराजमध्ये अमिताभ बच्चनची क्रेझ : अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून या जागेवरून निवडणूक लढवली होती. त्यावेळी या जागेवर त्यांना बंपर पाठिंबा मिळाला होता. तेव्हा रिता बहुगुणा जोशी यांचे वडील हेमवती बहुगुणा यांचा 1 लाख 9 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी प्रयागराजमध्ये अमिताभ बच्चन यांची जबरदस्त क्रेझ होती. अमिताभ बच्चन यांचे बालपण प्रयागराजमध्ये गेले आहे. अशा परिस्थितीत समाजवादी पक्षाला प्रयागराजमध्ये अमिताभ बच्चन यांच्या क्रेझचे भांडवल करायचे असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा :

  1. Big B greets fans bare feet : प्रेक्षकांना अभिवादन करताना पायात चप्पल का घालत नाही, याचा बिग बींनी केला खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details