नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान ( aap mla amanatullah khan ) यांचा व्यावसायिक भागीदार हमीद अली याला दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्यातील पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी अटक ( amanatullah khan business partner hamid ali arrested ) केली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी एसीबीने शुक्रवारी छापेमारी केली होती. त्यादरम्यान खानचा व्यावसायिक भागीदार हमीद अली याच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात आले होते आणि त्यादरम्यान 12 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्याच्या घरातून पिस्तूलसह गोळीही जप्त करण्यात आली. आता याप्रकरणी कारवाई करत दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्याच्या पोलिसांनी हमीद अलीला अटक केली आहे.
दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्हा पोलिसांनीशुक्रवारी दिल्ली वक्फ बोर्डाच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एसीबीने टाकलेल्या छाप्यात तीन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत, ज्यामध्ये शस्त्रास्त्र कायद्यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर त्याचवेळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण पूर्व जिल्ह्यातील जामिया नगर पोलीस ठाण्यात तिन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांचा व्यवसाय भागीदार हमीद अली याला दिल्लीच्या दक्षिण पूर्व जिल्ह्याच्या पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केली आहे.