महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 6, 2020, 4:36 PM IST

ETV Bharat / bharat

शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपचा पाठिंबा, कार्यकर्ते ८ डिसेंबरला रस्त्यावर उतरणार

८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनास आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. पक्षाचे संयोजक गोपाल राय यांनी याची माहिती दिली.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली -केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (रविवार) दहावा दिवस आहे. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवरच मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनास आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. सरकारसोबतच्या चर्चेतून अद्याप तोडगा निघाला नसून ९ डिसेंबरला पुन्हा शेतकरी आणि केंद्रीय नेत्यांची बैठक होणार आहे.

आपचा आंदोलनाला पाठिंबा

हिवाळ्यामध्ये उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडते. दिल्लीत सध्या हाडे गोठवणारी थंडी आहे. अशा असह्य थंडीतही शेतकरी दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलन करत आहे. सुमारे १ वर्षाचे राशन बरोबर असल्याचे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले आहे. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर रस्त्यांवरच आंदोलन करत राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

आम आदमी पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा

आम आदमी पक्षाचे संयोजक गोपाल राय म्हणाले, 'तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना जबरदस्तीने कायद्याचे फायदे सांगत आहे. दिल्ली आणि देशभरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. अरविंद केजरीवाल यांनीही आवाहन केले आहे'.

देशवासियांनीही समर्थन करावे

देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना गोपाल राय म्हणाले, ही लढाई फक्त शेतकऱ्यांची नाही. ही देशाची लढाई आहे. जर शेतीला संपवलं तर देशालाही संपवण्यासारखं आहे. त्यामुळे सर्व राज्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. सर्वसामान्य नागरिकांनीही भारत बंदमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन गोपाल राय यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details