सूरत -गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujrat Election 2022) राजकारण आता शिगेला पोहोचले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. भाजप, आप आणि काँग्रेसकडून निवडणुकीत जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत होण्याची अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. (AAP vs BJP in Gujrat Election 2022). प्रचारदरम्यान सुरतच्या सरठाणा भागात निवडणूक रॅलीत आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. (AAP and BJP workers clashed). कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली.
AAP vs BJP: प्रचारादरम्यान आप आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडले, गाड्यांची तोडफोड - AAP vs BJP
सरठाणा येथील योगी चौकात आप आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. (AAP and BJP workers clashed). दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. (AAP vs BJP in Gujrat Election 2022).
दोन्ही पक्षांकडून दगडफेक - भाजपच्या कार्यालयावर दगडफेक सुरतमधील किरण चौकात 'आप'च्या वतीने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या सरठाणा भागात 'आप'च्या सभेत खुर्ची फेकल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. 'आप'ची बैठक आटोपल्यानंतर भाजप कार्यालयात गोंधळ उडाला. दरम्यान, भांडण इतके वाढले की समोरासमोर दगडफेक करण्यात आली. भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत भाजपचा एक कार्यकर्ता जखमी झाला. यावेळी आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
बीएसएफच्या जवानांनी प्रकरण आटोक्यात आणले - त्यानंतर सरठाणा येथील योगी चौकात आप आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आप आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. आप आणि भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचाही फुटल्या. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांचा ताफा आणि बीएसएफच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संपूर्ण प्रकरण आटोक्यात आले आहे.