महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 8, 2022, 5:25 PM IST

ETV Bharat / bharat

Aakar Patel Again Stopped :अ‍ॅम्नेस्टी इंडियाच्या माजी प्रमुखांना परदेशात जाण्यापासून रोखले, सीबीआय विरुध्द अवमान दाखल

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे (Amnesty International India) माजी प्रमुख आकार पटेल यांना सीबीआयने गुरुवारी रात्री फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले. (Aakar Patel again stopped at Bengaluru airport) सीबीआयने लुकआउट परिपत्रकाचा हवाला देत हे कृत्य केले, तर न्यायालयाने पुर्वीच लुकआऊट नोटीस मागे घेण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत पटेल यांनी सीबीआयविरोधात अवमान अर्ज दाखल (CBI anti contempt application) केला आहे.

Aakar Patel
आकार पटेल

बंगळुरू (कर्नाटक):अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे माजी प्रमुख आकार पटेल यांना बेंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेला जाण्यापासून पुन्हा रोखण्यात आले आहे. दिल्ली न्यायालयाने सीबीआयला त्यांच्याविरुद्ध जारी केलेली लुकआउट नोटीस त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली होती आणि सीबीआय संचालकांना बुधवारी रात्री परदेशात जाण्यापासून रोखल्याबद्दल माफी मागण्यासही सांगितले होते.

माध्यमांशी बोलताना पटेल यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा त्यांना अधिकाऱ्यांनी पुन्हा थांबवले. "त्यांनी मला का थांबवले ते मला माहीत नाही. मला काही तासांतच हे कळणार आहे," हा आदेश देताना दिल्ली न्यायालयाने असेही नमूद केले होते की, एलओसी मागे घेण्यासोबतच सीबीआयकडून लेखी माफी मागितल्यास त्याच्या जखमा भरून निघतील.

न्यायालयाच्या स्पष्ट सूचना असूनही, पटेल यांना विमानतळावर इमिग्रेशन काउंटरवर थांबवण्यात आले आणि सीबीआय ने त्यांचे परिपत्रक काढले नाही. न्यायालयाचे निर्देश अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा हा परिणाम असू शकतो असे सूत्रांनी सांगितले. ताबडतोब, थांबवल्यानंतर पटेल यांनी अधिका-यांनी त्यांना फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखल्याबद्दल ट्विट केले होते.

पटेल यांना सीबीआयने जारी केलेल्या एलओसीच्या संदर्भात FCRA च्या कथित उल्लंघनासाठी ऍम्नेस्टी इंटरनॅशनल विरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या संदर्भात थांबविण्यात आले. एफआयआरमध्ये आरोपी म्हणून त्यांचे नाव नाही आणि सीबीआयने त्यांना कधीही बोलावले नाही, असे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सादर केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details