महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 22, 2022, 5:04 PM IST

ETV Bharat / bharat

तोंडाने श्वास देत नवजात बाळाचे महिला डॉक्टरने वाचवले प्राण; व्हिडिओ होतोय व्हायरल

माणुसकी जिवंत ठेवण्यासाठीही अनेक लोक आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात. सध्या एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉ. सुरेखा चौधरी नवजात बाळाला वेळेवर ऑस्किजन मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या बाळाच्या तोंडाला तोंड लावून जिवनदान देण्याचे काम करत आहेत. (Mouth To Mouth Breathing) ही बातमी ईटीव्ही भारत'वर (दि. 14 मार्ज 2022)रोजी प्रसिद्ध झालेली आहे. दरम्या, हा व्हिडिओ सध्या जास्त चर्चेत आल्याने ही बातमी पुन्हा लावण्यात आली आहे.

तोंडाने श्वास देत नवजात बाळाचे महिला डॉक्टरने वाचवले प्राण
तोंडाने श्वास देत नवजात बाळाचे महिला डॉक्टरने वाचवले प्राण

आगरा - माणसाला माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या वारंवार गोष्टी घडत असतात. माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली अस आपण म्हणतो. परंतु, माणुसकी जिवंत ठेवण्यासाठीही अनेक लोक आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आणि त्यासाठी ते अनेक अशक्य कामही करत असतात. सध्या एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. (A woman doctor in Agra saved a newborn baby life) आगरा जिल्ह्यातील एतमादपूर सीएचसीमध्ये ज्यामध्ये डॉ. सुरेखा चौधरी नवजात बाळाला वेळेवर ऑस्किजन मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या तोंडाला तोंड लावून बाळाला जिवनदान देण्याचे काम करत आहेत. प्रसूतीनंतर नवजात अर्भकाला मशीन काम करत नसल्याने ऑक्सिजन मिळत नव्हता तेव्हा डॉ. चौधरी यांनी हे माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.

तोंडाने श्वास देत नवजात बाळाचे महिला डॉक्टरने वाचवले प्राण

माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम -आगरा जिल्ह्यातील एतमादपूर सीएचसीमध्ये महिला डॉक्टरने तोंडावाटे ऑक्सिजन देऊन नवजात बालकाचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक महिला डॉक्टरांचे अभिनंदन करत आहेत आणि त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. वास्तविक, प्रसूतीनंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑक्सिजन मशीनद्वारे श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मशीन चालत नाही हे लक्षात आल्यानंतर डॉ. चौधरी यांनी हे माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - रक्ताने माखलेल्या नवजात अर्भकाला श्वास देण्यासोबतच डॉ. सुरेखा छातीवर पंप करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर नवजात बालकाला जीवदान देण्यात तिला यश आले. नवजात बालकाचा श्वास परत आल्याने डॉ. सुरेखा यांच्या चेहऱ्यावरही आनंद आणि चमक आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक डॉ. सुरेखा यांच्या या कामाचे कौतुक करत आहेत.

याआधीही अशा प्रकारे मुलांचे प्राण वाचवले - प्रसूतीसाठी जास्त वेळ लागल्यामुळे नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे डॉ. सुरेखा चौधरी यांनी सांगितले. जेव्हा त्याला मशीनमधून ऑक्सिजन देण्यात यश आले नाही तेव्हा त्याने तोंडातून श्वास घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. सुमारे सात मिनिटांनंतर बाळ रडायला लागले. दरम्यान, डॉ. चौधरी म्हणाल्या की मी याआधीही अशा प्रकारे मुलांचे प्राण वाचवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details