महाराष्ट्र

maharashtra

Woman Suicide for blouse : पतीने आवडीनुसार ब्लाउज न शिवल्याने पत्नीची आत्महत्या

By

Published : Dec 6, 2021, 4:23 PM IST

Updated : Dec 6, 2021, 4:49 PM IST

श्रीनिवास आणि विजयालक्ष्मी हे दाम्पत्य हैदराबादमधील अंबरपेठेत राहते. श्रीनिवास हा शिंपी आहे. तो साड्या विकतो आणि शिलाईचे काम देखील करतो. शनिवारी श्रीनिवासने पत्नी विजयालक्ष्मीसाठी ब्लाउज शिवला. पण तिला ब्लाउज आवडला नाही. ती तिच्या पतीवर ओरडली. तेव्हा श्रीनिवासने तिला शिवीगाळ करून ब्लाउज स्वतः शिवण्यास सांगितले. याचाच राग मनात धरून पत्नीने आत्महत्या ( Woman Suicide for blouse in Hyderabad ) केली.

husband did not sew wife choice blouse
ब्लाउज न शिवल्याने एका महिलेची आत्महत्या

हैदराबाद - पतीने आपल्या आवडीनुसार ब्लाउज न शिवल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब हैदराबादेत ( Woman Suicide for blouse in Hyderabad ) घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीने शिवलेला ब्लाउज आवडला नाही -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास आणि विजयालक्ष्मी हे दाम्पत्य हैदराबादमधील अंबरपेठेत राहते. श्रीनिवास हा शिंपी आहे. तो साड्या विकतो आणि शिलाईचे काम देखील करतो. शनिवारी श्रीनिवासने पत्नी विजयालक्ष्मीसाठी ब्लाउज शिवला. पण तिला ब्लाउज आवडला नाही. ती तिच्या पतीवर ओरडली. तेव्हा श्रीनिवासने तिला शिवीगाळ करून ब्लाउज स्वतः शिवण्यास सांगितले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

गळफास लावून केली आत्महत्या -

भांडणानंतर विजयालक्ष्मी बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला. दुपारी 12.30 वाजता तिची मुले शाळेतून घरी आली आणि दरवाजा ठोठावला. पण तिने प्रतिसाद दिला नाही. तिचा नवरा आला आणि दरवाजा ठोठावला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. श्रीनिवास दरवाजा तोडून आत गेला आणि तिथे त्याला विजयालक्ष्मीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले.

गुन्हा दाखल -

त्यानंतर श्रीनिवासने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस आत्महत्येच्या घटनास्थळी दाखल झाले, तपासणी करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा -शौचालयास गेलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या, अमरावती जिल्ह्यातील घटना

Last Updated : Dec 6, 2021, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details