जम्मू-काश्मीर -मकबूल शेरवानी असा माणूस ज्याने पाकिस्तानी हल्लेखोरांना चूकीचा मार्ग दाखवत भारतीय लष्करांना काश्मीर काबीज करण्यासाठी मदत केली होती. 1947 मध्ये पाकिस्तानच्या आदिवासी आक्रमणकर्त्यांनी काश्मीरला जाताना बारामुल्लाजवळ, शेरवानी म्हणून ओळखल्या जाणार्या मकबूल शेरवानीने चुकीचा मार्ग दाखविला. ज्यामुळे श्रीनगरच्या दिशेने जाण्यास त्यांना विलंब झाला. ज्यामुळे भारतीय सैन्याला श्रीनगर विमानतळ ताब्यात घेण्याची संधी मिळाली. 22 ऑक्टोबर 1947 रोजी पाकिस्तानी आदिवासींनी सीमा ओलांडून काश्मीरवर आक्रमण केले. त्यानंतर काश्मीरचे महाराजा हरिसिंह श्रीनगरमधून पळून गेले आणि भारतीय लष्करांच्या मदतीसाठी जम्मूला पोहोचले. 26 ऑक्टोबर रोजी महाराजांनी भारतासोबत विलयीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर लगेचच भारतीय सैन्याने पाकिस्तानी आदिवासींवर कारवाई केली आणि त्यांना दीर्घ युद्धानंतर माघार घेण्यास भाग पाडले.
मकबूल शेरवानीने देशाच्या संरक्षणासाठी दिले बलिदान
बारामुल्ला नगरपालिका समितीचे अध्यक्ष तौसीफ रैना यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना स्वर्गीय मकबूल शेरवानी यांच्या नावाचे विद्यापीठ स्थापन करण्याचे विनंती केली आहे. ज्यामुळे लोकांना खात्री होऊ शकेल, की मकबूल शेरवानी यांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेले बलिदान किती महत्त्वपूर्ण होते. आज जेव्हा काश्मिरी लोकांना या आदिवासींच्या हल्ल्याची आठवण येते. तेव्हा बारामुल्ला येथील 22 वर्षीय मकबूल शेरवानी यांची आठवण आपसूकच येते. मकबूल शेरवानी यांनी भारतीय लष्कराला मदत करून हा हल्ला उधळून लावण्यात मोलाचा वाटा उचलला होता.