महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Social Harmony in Karnatak : सहा वर्षाच्या मुलीचा रोजानिमित्त उपवास; हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक - Social Harmony in Karnatak

वासुदेव नारायण राव यांच्या कुटुंबीयांनी अलीसाबा कुंटोजी यांच्या सहा वर्षांची नात ( 6 years girl Ramadan fast ) शिफनाझला घरी बोलावून आरती केली. शिफनाज यांनी रविवारी पहाटे तीन वाजता उठून रमजानचा उपवास केला होता. यावर कुंतोजींचे बालपणीचे मित्र वासुदेव शास्त्री यांनी शिफानझचा सन्मान करण्याचे ठरवले. मुस्लिम कुंटोजी कुटुंबाच्या संमतीने शास्त्रींनी मुलीला आपल्या घरी बोलावून तिचा सन्मान केला. शास्त्रींची मुले गौरी आणि राणी यांनी शिफनाझला ( Shifanaz Vijaypura video ) तयार केले. यावेळी मुलीची आरती करण्यात आली.

हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक
हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक

By

Published : Apr 21, 2022, 3:40 PM IST

मुद्देबिहाळा (विजयपुरा) - कर्नाटकातील मुद्देबिहाळा येथे हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी सामाजिक ऐक्याचे उदाहरण ( Muddebihala Hindu Muslim family ) दाखवून दिले आहे. हिंदू आणि मुस्लिम असलेल्या दोन मित्रांची पन्नास वर्षांपासूनची ( Hindu Muslim family friendship ) मैत्री आहे.

मुद्देबिहाळा येथे वासुदेव नारायण राव शास्त्री यांची फोटोग्राफर अलीसाबा कुंटोजी यांच्याशी मैत्री आहे. रमजानच्या महिन्यात या दोन कुटुंबांनी एकमेकांच्या परंपरांचा सन्मान केला. त्यामुळे ही दोन कुटुंबे चर्चेचा विषय ठरली आहेत.

वासुदेव नारायण राव यांच्या कुटुंबीयांनी अलीसाबा कुंटोजी यांच्या सहा वर्षांची नात ( 6 years girl Ramadan fast ) शिफनाझला घरी बोलावून आरती केली. शिफनाज यांनी रविवारी पहाटे तीन वाजता उठून रमजानचा उपवास केला होता. यावर कुंतोजींचे बालपणीचे मित्र वासुदेव शास्त्री यांनी शिफानझचा सन्मान करण्याचे ठरवले.

हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक

मुस्लिम कुंटोजी कुटुंबाच्या संमतीने शास्त्रींनी मुलीला आपल्या घरी बोलावून तिचा सन्मान केला. शास्त्रींची मुले गौरी आणि राणी यांनी शिफनाझला ( Shifanaz Vijaypura video ) तयार केले. यावेळी मुलीची आरती करण्यात आली. वासुदेव नारायण राव कुटुंबाने शिफनाझला नवीन ड्रेस देण्यासोबत मिठाईही ( Vasudev Narayan Rao Vijaypura ) खाऊ घातली. हे पाहून मुलीचे पालख खूप आनंदी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा-Kerala Vishu Slap festival : दे दणा दण ; केरळमध्ये एकमेकांना चापटा मारण्याची अनोखी स्पर्धा, पाहा व्हिडिओ

हेही वाचा-SC on Jahangirpuri Demolition : जहांगीरपुरीमध्ये बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी बंदी

ABOUT THE AUTHOR

...view details