कोल्लम - केरळमध्ये दोन वर्षांचा मुलगा शुक्रवारी सकाळी घरातून बेपत्ता झाला होता. पोलिस आणि बचाव दलाने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. पोलिस आणि बचाव दलाने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला मात्र मुसळधार पावसामुळे ते परत आले. आणि दुसऱ्या दिवशी बचाव पथकाला सकाळी जवळच्या रबर इस्टेटमध्ये हा सापडला आहे. मुसळधार पाऊस पडत असताना रबर इस्टेटमध्ये दोन वर्षांचा मुलगा रात्रभर कसा जगला हे एक गूढ आहे. ( keral child missing case )
मुसळधार पावसामुळे पथक परतले होते वापस - अन्सारी यांचा मुलगा फरहान आणि थडिक्कड येथील फातिमा या मुलाला नंतर प्राथमिक तपासणीसाठी तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस आणि श्वान पथक फरहान घरातून बेपत्ता झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते. मुसळधार पावसामुळे शोध पथकाला परतावे लागले.