पुलवामा -दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील अरिगाम गावात सरकारी दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. 6 एप्रिल)रोजी दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका अज्ञात अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
Terrorist Killed In Pulwama : पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार - Terrorist Killed In Pulwama
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील अरिगाम गावात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. 6 एप्रिल)रोजी दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका अज्ञात अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
फाईल फोटो
एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला - पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने परिसरात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून शोध मोहीम (CASO) सुरू केली. असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जेव्हा सैनिकांची तुकडी संशयित ठिकाणी पोहोचली तेव्हा लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचवेळी प्रत्युत्तर दिले गेले त्यामध्ये गोळीबार झाला. दरम्यान, एका अतिरेक्याचा खात्मा करण्यात आला आहे.