महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आई मी मरत आहे, तू आनंदी राहा... असे शाळेच्या बोर्डावर लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या

कलबुर्गी येथील एमएसके मिल या भागात दहावीतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावेळेस त्याने बोर्डवर खडूने आईच्या नावे संदेश लिहीला होता. हा संदेश वाचल्यानंतर अनेकांना गहिवरुन आले. एवढ्या कारणावरुन कुणी कसे काय आत्महत्या करु शकतो, असा प्रश्न सर्वांना पडला.

तरुणाची आत्महत्या
तरुणाची आत्महत्या

By

Published : Apr 14, 2021, 4:28 PM IST

Updated : Apr 14, 2021, 4:44 PM IST

कलबुर्गी - कलबुर्गी येथील एमएसके मिल या भागात दहावीतील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावेळेस त्याने बोर्डवर खडूने संदेश लिहीला होता. त्याच्या आत्महत्येने परिसरात शोकाकूल वातावरण पसरले आहे. आईवडीलांना तर याचा मोठा धक्का बसला आहे. आईच्या नावाने त्याने वर्गाच्या बोर्डवर एक संदेश लिहिला होता. तो संदेश वाचल्यावर अनेकांना धक्का बसला.

विद्यार्थ्याची आत्महत्या

शेख उमर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मदिना कॉलनी येथील आएशा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहावीत शिकत होता. त्याने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केली. त्या वेळेस त्याने बोर्डवर संदेश लिहीला होता.

बोर्डवर लिहीला संदेश

आई मी मरत आहे. तू आनंदी राहा. मी गेल्यानंतर तू ४ दिवस रडशील. दु:ख करशील असा संदेश त्याने बोर्डवर लिहीला होता. आई वडिलांनी ओरडल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही पोलिस सखोल तपास करत आहे. हा संदेश त्यानेच लिहिला आहे, की नाही याचीही शहानिशा केली जात आहे. त्यासाठी रायटिंग एक्सपर्टची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात आईवडीलांचे बयानही घेतले आहे.

पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

Last Updated : Apr 14, 2021, 4:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details