गाझियाबादमध्ये भरधाव वाहनाने एका तरुणाला चिरडले नवी दिल्ली/(गाझियाबाद) : गाझियाबादमध्ये एका १५ वर्षीय तरुणाला वाहनाने धडक दिली. वाहन चालकाने या तरुणावर कोणतीही दयामाया दाखवली नाही. पीडित किशोर वाहनाखाली दबला असता आरोपी वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवले, त्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला. घटनेच्या वेळेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. वाहनाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. तसेच, याचे सीसीटीव्हीही तपासले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच चालकाने वाहन थांबवले : हे प्रकरण गाझियाबादच्या कविनगर पोलीस स्टेशन परिसरातील गोविंदपुरमचे आहे. जिथे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा रस्त्यावरून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मागून भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने तरुणाला चिरडले. घटनेची माहिती मिळताच चालकाने वाहन थांबवल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
हेही वाचा :Arrest for threatening PM : पंतप्रधान मोदींना धमकावल्याप्रकरणी आणखी 2 आरोपींना गुजरात पोलिसांनी मध्यप्रदेशात पकडले
कार चालकाने गाडी अधिक वेगाने पळवली : वाहन थांबवल्यावर मुलगा वाहनाखाली अडकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर कार चालकाने गाडी अधिक वेगाने पळवली. वाहन तरुणाच्या अंगावरून गेल्यावर त्याखाली अडकलेला तरुण दिसत होता. त्या मुलाने खूप हिंमत दाखवली आणि त्यादरम्यान आवाजही केला. स्थानिक लोकांच्या मदतीने मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा :14 Accused Including Lalu Yadav : जमीन घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांच्यासह 14 आरोपी दिल्ली एव्हेन्यू कोर्टात राहणार हजर
वाहन चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले : या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्हीमध्ये वाहनाचा क्रमांक दिसत नसून, उर्वरित सीसीटीव्हीच्या टाईमलाइनवरून पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत.