अहमदाबाद -गुजरातसह संपूर्ण देश हादरवून सोडणार्या 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Bomb Blast) प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी 6 जुलै 2008 साली बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये 56 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर, 246 जण गंभीर जखमी झाले होते. अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी झालेल्या 21 बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालय त्यांना नेमकी कोणती शिक्षा सुनावतेय, याकडे गुजरातसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीचा बदला घेत दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट केले होते. 70 मिनिटांमध्ये एकापाठोपाठ एक केलेल्या 21 स्फोटांत 56 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, तर 246 लोक गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, इंडियन मुजाहिद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाशी संबंधित दहशतवाद्यांनी हे साखळी बॉम्बस्फोट घडवले होते.