बाराबंकी :जिल्ह्यातील 4 वृद्ध महिलांची हत्या करणाऱ्या सीरियल किलरला सोमवारी अटक करण्यात आली. अयोध्येतील मवई येथून पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या एक महिन्यापासून बाराबंकी, अयोध्या आणि आसपासचे पोलीस त्याच्या अटकेसाठी गावोगाव आणि जंगलात शोध घेत होते. या सीरियल किलरमुळे परीसरामध्ये प्रचंड घबराहट पसरली होती. सोमवारी अयोध्या पोलिसांनी अटक केलेल्या त्या तरुणांला बाराबंकी येथील घटनास्थळी ओळख पटवण्यासाठी आणले होते. सध्या पोलीस त्या तरुणाची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुनहुना गावात हा तरुण एका महिलेला मारण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी संबंधित महिलेने आरडा ओरडा गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याने आपले नाव अमरेंद्र रावत असल्याचे सांगितले. जो बाराबंकी जिल्ह्यातील असांद्रा पोलीस स्टेशन परिसरातील सदवा भेलू गावचा रहिवासी आहे. त्याच्या दहशतीमुळे महिलांनी घरातून एकटे बाहेर पडणे बंद केले होते.
शुक्रवार 30 डिसेंबर रोजी रामस्नेहीघाट पोलीस स्टेशन हद्दीतील थाथरा गावाच्या काठावर गावकऱ्यांना चप्पल, कपडे, एक पायल आणि एक बाटली पडलेली दिसली. थोडे पुढे गेल्यावर एका ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला दिसला. मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गुरुवारी रात्री शौचासाठी बाहेर गेली होती. मात्र, घरी परतली नाही. नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. कुटुंबीयांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला होता. त्याचप्रमाणे 17 डिसेंबर रोजी घटनास्थळापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या गावातील नाल्याच्या काठावर 65 वर्षीय महिलेचा असाच संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.