श्रीनगर (ज.का) -प्रदेशातून पुन्हा थरारक बातमी समोर आली आहे. श्रीनगर येथे दोन शिक्षकांची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. इदगाह येथील गव्हरमेंट बाईज हायर सेंकडरी स्कूलमध्ये ही घटना घडली.
प्रतिक्रिया देताना पोलीस महासंचालक, नागरिक आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -माझ्यावर राजीनाम्याचा कोणताही दबाव नाही; अजय मिश्रा तेनी यांची प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अतिरेक्यांनी शाळेच्या आवारात त्यांच्यावर गोळीबार केला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे, ती शाळेची प्राचार्य असून सुपिंदर कौर असे त्यांचे नाव आहे, तर इतर मृत व्यक्तीचे नाव दीपक चंद असे आहे. सुरक्षा रक्षकांनी परिसराला घेराव घातला आहे.
काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र
हे हल्ले काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे आणि ते पाकिस्तानमधील एजन्सींच्या सूचनेनुसार केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.
यापूर्वी झाल्या हत्येच्या घटना
दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात तीन जणांची हत्या केली होती. यामध्ये लोकप्रिय मखन लाल बिंदू या काश्मिरी पंडिताचाही समावेश आहे. त्यांची दहशतवाद्यांनी इक्बाल पार्कमध्ये हत्या केली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अज्ञात दहशतवाद्यांनी इक्बाल पार्कमधील बिंदू मेडिकेअर या प्रसिद्ध मेडिकलचे मालक पंडित मखन लाल बिंदू यांची हत्या केली. श्रीनगरमधील हरी सिंग रस्त्यावर असलेल्या दुकानातच त्यांची हत्या करण्यात आली होती.
बिहारमधील फेरीवाल्याची हत्या
लालबझार भागातील मदिना चौकात फेरीवाल्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री ८ वाजता संशयित दहशतवाद्यांनी फेरीवाल्यावर हल्ला केला. यावेळी जागेवरच फेरीवाल्याचा मृत्यू जाला. विरेंदर पासवान, असे फेरीवाल्याचे नाव आहे. तो बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पासवान हे श्रीनगरमधील अलमगिरी बाजार येथे राहत होते.
भाजपकडून आरोपींच्या अटकेची मागणी
भाजपचे राज्य प्रभारी अल्ताफ ठाकूर यांनी बिंदू यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. बिंदू हे शांत स्वभावाचे आणि नेहमीच लोकांची काळजी घेणारे होते. निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करणाऱ्यांना कोणताही धर्म नाही. धर्माच्या नावावर हत्येचे कधीही समर्थन करता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडून अटक करावी, अशी विनंती असल्याचे अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले होते.
हेही वाचा -कर्नाटक: मुसळधार पावसाने घर कोसळले; बेळगाव जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू