लखनौ-उत्तर प्रदेशमधील संत कबीर जिल्ह्यातील मेहदावल येथे ६५ वर्षीय व्यक्तीचा कप्पा या कोरोनाच्या व्हेरियंटमुळे मृत्यू झाला आहे. कप्पा व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली आहे. अद्याप, त्यांच्यामध्ये कप्पा व्हेरियंटची लागण झालेली नाही.
मेहदावल येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. अति ताप असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा १४ जूनला मृत्यू झाला.
हेही वाचा-ZIKA VIRUS आणखी १४ जणांना केरळमध्ये लागण
नातेवाईकाच्या माहितीनुसार रुग्णाला मेहदावल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. २७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आली होती. मृताचा मुलगा अनुराग सिंह याने सांगितले, की २८ मे रोजी वडिलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे १४ दिवस उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नव्हती. मुख्य वैद्यकीय अधिकारी इंद्र विजय विश्वकर्मा म्हणाले, की माध्यमातील माहितीतून रुग्णाला कप्पा कोरोना व्हेरियंटमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कळाले आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.