महाराष्ट्र

maharashtra

Satish kaushik Death Case : सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांकडून मात्र तथ्थ नसल्याचा दावा

By

Published : Mar 12, 2023, 10:34 PM IST

अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांची पत्नी सानवी मालू यांनी त्यांच्यावर सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत अशी कोणतीही शक्यता व्यक्त केलेली नाही.

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली :बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी आता आणखी एक नवा पेच समोर आला आहे. खरे, तर एका महिलेने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली असून, तिच्या पतीने १५ कोटी रुपयांच्या वादातून आपली फसवणूक केल्याचा दावा केला आहे. त्यात पडून सतीश कौशिक यांचा खून झाला आहे. फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांची पत्नी सानवी मालू असल्याचा दावा महिलेने केला आहे.

अनैसर्गिक पद्धतीने झाल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी फेटाळली : सानवी मालू म्हणाल्या की, विकास मालूचा सतीश कौशिक यांच्यासोबत 15 कोटींबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्याचवेळी, सानवीने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सतीश कौशिक माझ्यावर 15 कोटी परत करण्यासाठी दबाव आणत होते. मात्र, ते परत करण्यासाठी माझ्या पतीकडे पैसे नव्हते. यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. मात्र, दुसरीकडे शनिवारी रात्री सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला. परंतु, अनैसर्गिक पद्धतीने झाल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी फेटाळली आहे.

सर्व प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत : याचवेळी सानवीचा दावा आहे की, सतीश कौशिक हे पैशांसाठी गेल्या वर्षी दुबईला गेले होते. त्यावेळी विकास मालू आणि त्यांची पत्नी दुबईत होते. त्यांच्या पत्नीचा दावा आहे की, त्या वेळी दोघांमध्ये वाद होत असताना तिने ड्रॉईंग रूममध्ये दोघांचे बोलणे ऐकले. या प्रकरणात कितपत तथ्य आहे हे सांगणे हे तपसालले नाही. या सर्व प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

संशयास्पद काहीही आढळून आले नाही :तपासादरम्यान, फार्म हाऊसवर विशेष गुन्हे पथकाने आवश्यक पुरावे गोळा केले आणि फोटो काढले. मात्र, आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही. ज्या ठिकाणी ते थांबला होते. ज्या खोलीत ते विश्रांती घेत होते. तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचीही चौकशी करण्यात आली. एवढेच नाही तर तेथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले असता त्यातही काहीही आढळून आले नाही. 9 मार्च रोजी डॉक्टरांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले गेले. तसेच त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलीस सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून पोलिसांनी त्यांच्यावरही संशय व्यक्त केलेला नाही.

हेही वाचा :ITI Student Suicide : नागपूर आयटीआयमधील विद्यार्थीनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details