राजकोट:दुसऱ्या धर्मातील तरुणाशी लग्न केल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका महिलेच्या पतीला बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली ( Honor killing In Hyderabad ) होती. आता गुजरातमधील राजकोटमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. एका 22 वर्षीय तरुणाची प्रेमकथा देखील येथे एका भयानक हत्याकांडाने संपुष्ठात ( Gujrat Rajkot Murder ) आली. तरुणी सुमियाचा भाऊ आणि इतर कुटुंबीयांनी मिथुन ठाकूरवर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू ( Brother Killed Sister Lover ) झाला. सुमियाला तिच्या प्रियकराला वाचवता आले नाही, म्हणून तिने तिच्या हातातील नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला.
अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते - जवळच्या कारखान्यात काम करणारा बिहारचा मिथुन ठाकूर अनेक महिन्यांपासून सुमिया काडीवार या १८ वर्षांच्या मुलीला डेट करत होता. ते त्याच ठिकाणी असलेल्या जंगलेश्वर मेनरोडवरील राधाकृष्ण सोसायटीत राहत होते. याच काळात ते एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांचे प्रेम अधिक घट्ट झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
घरात घुसून मारहाण केली-मिथुन ठाकूरने सोमवारी सकाळी १० वाजता सुमियाशी तिच्या फोनवर संपर्क साधला, पण तिचा भाऊ साकीर याने उत्तर दिले. त्याने ठाकूरला इशारा दिला आणि दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. साकीर त्याला सुमियाजवळ न येण्याचा इशारा देत होता.