सारण :बिहारमधील छपरा येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीला जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. ही घटना नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती आहे. पीडितेचे वडील तिथे नाहीत. घटनेबाबत पीडितेने सांगितले की, रविवारी ती काही कामानिमित्त घरून निघाली होती. तिच्यासोबत एक मित्रही होता, त्यानंतर चार मुलांनी तिला बळजबरीने उचलून निर्जनस्थळी नेले आणि या सर्वांनीच बलात्काराची घटना घडवून आणली.
घटनास्थळावरून आरोपी फरार : घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. पीडितेने कसेबसे तिच्या घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर रात्रीचं मुलीला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी तीची प्रथमिक तपासनी केल्यानंतर तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेचे जबाब नोंदवले आहेत. पीडितेने दोन्ही आरोपींना ओळखले आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या पीडितेला महिला पोलिसांच्या ताब्यात छपरा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कोणताही अधिकारी काहीही सांगण्यास टाळाटाळ करत आहे असी माहितीही समोर आली आहे.