कानपूर उत्तरप्रदेश शहरात Kanpur of Uttarpradesh राहणाऱ्या एका व्यावसायिकाला तीन किडनी असल्याचं प्रकरण समोर आलं Man with Three Kidneys आहे. लोक याला निसर्गाचा करिष्मा म्हणत आहेत. ईटीव्ही भारतच्या टीमने या व्यक्तीशी खास बातचीत केली. सुशील गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे.
त्यांनी सांगितले की, 2020 मध्ये त्यांनी मूत्राशयाच्या ऑपरेशनसाठी अल्ट्रासाऊंड तपासणी केली होती. तेव्हाच तीन किडनी असल्याची बाब समोर आली. काही महिन्यांनी पुन्हा अल्ट्रासाऊंड केले आणि तीन किडनी असल्याची पूर्ण खात्री झाली. सुशील म्हणाले की, त्याला आतापर्यंत कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही.
या व्यक्तीला आहेत तब्बल तीन किडन्या, म्हणाले दान करावी लागली तरी करेल 52 वर्षीय सुशील सांगतात की, त्यांना आतापर्यंत कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. तो आपले जीवन सामान्यपणे जगत आहे. किडनीबाबत कधीही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही. ते म्हणाले की, आमच्या पूर्वजांनी त्यांच्यावर विशेष उपकार केला आहे, कदाचित त्यामुळेच त्यांना तीन किडनी मिळाल्या आहेत. त्यांना आतापर्यंत किडनीची कोणतीही समस्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
नेत्रदानाची शपथ घेतलेल्या सुशील गुप्ता सांगतात की, नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला असला तरी, जर एखाद्याला किडनीची गरज भासली तर ते मागे हटणार नाहीत. त्याला नक्कीच मदत करेल. मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. तिन्ही मूत्रपिंडांना तो दैवी आशीर्वाद सांगत आहे आणि देवाचे आभार मानताना थकत नाही. A Man with Three Kidneys in Kanpur of Uttarpradesh
हेही वाचाFirst Heart Transplant Operation दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात करण्यात आले हृदय प्रत्यारोपणाचे पहिले यशस्वी ऑपरेशन