महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगळुरूमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण : तृतियपंथीयांनी केली तरुणीची सुटका

बंगळुरूमध्ये एका तरुणीवर बलात्कार होता-होता ( Sexually assaulted ) वाचला. तृतियपंथीयांनी ( Transgenders ) वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणी वाचली. त्यामुळे या तृतियपंथीयांचे कौतुक होत आहे.

बंगळुरूमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण
बंगळुरूमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण

By

Published : Jul 5, 2022, 11:17 AM IST

बेंगळुरू:येथे दोन तृतियपंथीयांनी ( transgenders ) तरुणीची एका नराधमाच्या हातून सुटका केली. रात्री उशिरा अज्ञात तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला विवेकनगर पोलिसांनी स्थानिक तृतियपंथीयांच्या मदतीने अटक केली आहे.

तृतियपंथीयांनी केली तरुणीची सुटका

पश्चिम बंगालमधून नोकरीच्या शोधात आलेली एक तरुणी विवेकनगरमध्ये राहायची. पश्चिम बंगालमधील आरोपी मसुराल शेख हा तिच्या घराजवळ दोन-तीन दिवसांपासून फिरत होता. त्याच भागात ती एकटी राहात असल्याचे त्याच्या लक्षात आले. 2 जुलै रोजी पहाटे चार वाजता त्यांनी दरवाजा ठोठावला. ती दरवाजा उघडत असतानाच त्याने तिच्यावर लैंगिक ( sexually assaulted ) अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

तिने त्याला जाण्याची विनंती केली आणि मी तुला पैसे देईन असेही तिने सांगितले. युवतीने आरडाओरडा करताच वरच्या फ्लॅटमध्ये राहणारी तृतियपंथी माहिरा सिंग आणि तिची मैत्रीण तेथे आली आणि दरवाजा तोडून आरोपीला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी विवेकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मसुराल खान याला अटक करण्यात आली आहे. हा मसुराल पश्चिम बंगालचा असून एका हॉटेलमध्ये काम करतो, अशी माहिती मिळाली आहे. ट्रान्सजेंडर असलेल्या माहिरा आणि तिच्या मैत्रिणीचे कौतुक होत असून, पश्चिम बंगालमधून शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीवर झालेला बलात्कार टाळून त्यांनी चांगेल काम केल्याने अभिनंदन होत आहे.

या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी अपार्टमेंटमध्ये एकटी असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आल्याचे सिटी सेंटर विभागाचे डीसीपी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले.

हेही वाचा - दुबईतून आलेल्या व्यक्तीची पॉन्डिचेरीतून सुटका, 15 लाखांसाठी अपहरण

ABOUT THE AUTHOR

...view details