महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Man lynched in Kapurthala : अमृतसरनंतर कपूरथळ्यात मॉब लिंचिंग.. गुरुद्वारातील ध्वजाची विटंबना केल्याचा आरोप - कपूरथळामध्ये जमावाने एकाला मारले

जाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर (Amritsar Golden Temple) येथे एका तरुणाने पावित्र्य भंग केल्याने त्याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्यानंतर 24 तासात तशीच घटना पंजाबमध्ये घडली आहे. कपूरथळा (Kapurthala) जिल्ह्यात स्थानिकांनी आणखी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत

Man lynched in Kapurthala
Man lynched in Kapurthala

By

Published : Dec 19, 2021, 10:24 PM IST

कपूरथळा - पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर (Amritsar Golden Temple) येथे एका तरुणाने पावित्र्य भंग केल्याने त्याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्यानंतर 24 तासात तशीच घटना पंजाबमध्ये घडली आहे. कपूरथळा (Kapurthala) जिल्ह्यात स्थानिकांनी आणखी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली (man killed in Kapurthala gurudwara) आहे. निजामपूर गावातील रहिवाशांनी पवित्र निशाण साहिबचा (शीख ध्वज) अनादर केल्याचा आरोप या तरुणावर केला आहे. जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

गुरुद्वारा साहिबच्या ग्रंथी (पुजारी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी धार्मिक भावना भडकावण्याच्या कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.ॉ

आयजी जालंधर गुरिंदर ढिल्लोन यांनी सांगितेल की, हा विषय संवेदनशील असल्याने पोलिसांनी संयमाचा वापर केला. हिंसक लोकांचा जमाव पोलिसांपेक्षा अधिक होता. सुवर्णमंदिरातील घटनेनंतर लोकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. 295अ अंतर्गत एफआयआर नोंदवले गेले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याची माहिती, हत्या झालेल्या व्यक्तीची पडताळणी केली जात आहे, जर ती हत्या असल्याचे दिसून आले तर त्यानुसार एफआयआर नोंदवला जाईल.

DGP यांनी केलेले ट्विट

काय आहे घटना -

पहाटे, निजामपूर गावातील स्थानिक गुरुद्वारामध्ये अपवित्र करण्याचा कथित प्रयत्न करण्यात आला. कथित गुन्हेगाराला पकडण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आली आणि खोलीत बंद करण्यात आले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र स्थानिकांनी त्याला ताब्यात देण्यास नकार दिला. अखेर गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली.

सिव्हिल हॉस्पिटल SMO संदीप धवन यांनी पुष्टी केली की, त्या व्यक्तीला रुग्णालयात मृत आणण्यात आले होते, ज्याचा मृतदेह मोर्चेरीत ठेवण्यात आला होता. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल, असे ते म्हणाले.

दरम्यान शनिवारी संध्याकाळी सुवर्ण मंदिरात असाच पावित्र्य भंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. गुरुद्वारामध्ये असलेल्या सोन्याच्या ग्रीलवरुन उडी मारत त्याने किरपाण उचली आणि शिख ग्रंथी पवित्र गुरु ग्रंथ साहिबचे पठण सुरु असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचला मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) टास्क फोर्सच्या सदस्यांनी त्या व्यक्तीला पकडले. मात्र, त्याला एसजीपीसी कार्यालयात नेत असताना तेथे उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details