कुशीनगर -तुर्कपट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमवा तिवारी गावात मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणाची रविवारी (दि. 3 ऑक्टोबर)रोजी हत्या करण्यात आली. प्रियसीच्या कुटुंबीयांनी तिला काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मृत विकासच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस चारही आरोपींना अटक करून त्यांची चौकशी करत आहेत.
UP: प्रियसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची केली हत्या; पोलिसांकडून चौघांना अटक - तुर्कपट्टी भागात प्रियकराला मारहाण
कुशीनगरमध्ये 22 वर्षीय तरुणाला काठ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (Youth Beaten To Death With Sticks In Kushinagar) हा तरुण आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता.
![UP: प्रियसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची केली हत्या; पोलिसांकडून चौघांना अटक प्रियकराचा मारहाणीत मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16546113-thumbnail-3x2-up.jpg)
पाथेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहसू सोमालीपट्टी येथील चंद्रशेखर प्रसाद यांचा मुलगा विकास याचे तुर्कपट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील अमवा तिवारी गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. विकासच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचे आणि मुलीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मुलगी त्याच्या घरी यायची. पण, तो मुलीला समजावून तिच्या घरी पाठवायचा. त्याचवेळी हा प्रकार मुलीच्या कुटुंबीयांनाही सांगितला. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुलीने मुलगा विकास याला घरी बोलावले होते. विकास घरातून दुचाकी घेऊन मुलीला भेटायला गेला. जिथे मुलीचा काका, भाऊ आणि चुलत भावांनी मिळून तिची लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. मृत विकास (22) हा 5 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. या घटनेमुळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच तुर्कपट्टी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. विकासच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे.